एक आदर्श व्यक्तिमत्व : प्राचार्य घोडके

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर. या सैनिकी विद्यालयाचे आदरणीय व सन्माननीय प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर आज सरांचा वाढदिवस.गेली 25 वर्षापासून सतत क्रियाशील असणारे ,विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, विद्यालयाच्या प्रगतीसाठी, अविरत प्रयत्न करणारे ,भाषेवर प्रभुत्व असणारे,” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे -” असे समजून वृक्षांवर तसेच मुलांवर प्रेम करणारे, वेळप्रसंगी कडक शिस्तीचे, मनमिळावू व आपल्या बोलण्यातून सर्वांना आकर्षित करून घेणारे, समोरच्या व्यक्तीला कितीही राग आला तरी आपलंसं करून बोलणारे व समजावणारे, विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी समजून त्यावर उपाय करणारे, उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे, विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांशी मिळून मिसळून राहणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवणारे, नेहमी हसतमुख व इतरांनाही मनोरंजनाच्या माध्यमातून खळखळून हसवणारे, कर्तव्यदक्ष, कर्तव्यशील, प्राचार्य म्हणून ओळखले जातात. 

विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारचे उपक्रम शालेय उपक्रम व सहशालेय उपक्रमांचे आयोजन सर करत असतात. विद्यार्थी व पालक सभा घेऊन पालकांची जागृती करणे, शिक्षणाबद्दल प्रेम, शाळेबद्दल जिव्हाळा निर्माण करणे, वृक्षारोपण करणे व वृक्ष संवर्धन करणे, विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, विद्यालयातील सर्व कर्मचारी व स्वतः प्राचार्य रक्तदान करतात. ही विशेष व उल्लेखनीय बाब सांगावीशी वाटते. विविध स्पर्धा व परीक्षांचेही आयोजन केले जाते. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, महात्मा गांधी विचार मंच परीक्षा, चित्रकला परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन ही करतात. सरांना बाग बगीचा व निसर्ग सौंदर्याची खूप आवड त्यामुळे शाळेचा परिसर सुंदर व वनराईने नटलेला दिसून येतो. विविध प्रकारच्या फुलांची झाडे व फळांची झाडे आपल्याला दिसून येतात. सर म्हणतात विद्यार्थी हे आपले दैवत आहे. विद्यार्थी आहेत म्हणून आपण आहोत. म्हणून जास्तीत जास्त काळजी विद्यार्थ्यांची घेतली पाहिजे. त्यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्याची दाद दिली पाहिजे कारण सर्वांना एकत्रित घेऊन एवढा मोठा कार्यभार चालवणे अत्यंत कठीण काम आहे परंतु तरीही सरांनी गेल्या 25 वर्षापासून अगदी कुशलतेने आपले कर्तव्य पूर्ण केले आहे व आजही करीत आहेत.

आज सरांचा वाढदिवस! वाढदिवसानिमित्त आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहो हीच श्री तुळजाभवानी चरणी प्रार्थना तसेच शुभ दीपावली व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

आपणा सर्वांना सरांचे असेच मार्गदर्शन मिळो हीच प्रार्थना व आपणा सर्वांतर्फे सरांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद🙏🏻

X