प्राचार्य वैजनाथ घोडके व सहशिक्षक देविदास पांचाळ यांना जळगावचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त !

दैनिक लोकमत

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय वैजनाथ घोडके सर व विद्यालयातील सहशिक्षक श्रीमान देविदास पांचाळ सर यांना जळगावचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार. 2022 प्राप्त झाला.

विद्यालयातील त्यांचे कार्य तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेता राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव, तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.

या यशामुळे विद्यालयाच्या उज्वल यशामध्ये मानाचा तुरा खोवला गेला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्वत्र कौतुक होत आहे.

X