Facebook
WhatsApp
Email

मित्रांनो आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन! आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला परंतु तरीही आपला मराठवाडा अजून स्वतंत्र झाला नव्हता! जुलमी, जाचक, अशा निजामाच्या गुलामगिरीत होता. हा मराठवाडा मुक्त करण्यासाठी शेकडो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले आहे! हजारो शूर, वीर, धाडसी युवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता व या सर्वांचे श्रेय म्हणून आपला मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला. तोच आजचा दिवस यालाच आपण मराठवाडा मुक्ती संग्राम असे म्हणतो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राफ, बाबासाहेब परांजपे, गोविंदराव पानसरे, अशा कितीतरी नेत्यांनी प्राण पणाला लावून मराठवाडा मुक्त केला. अशा सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन! 🙏🏻🙏🏻💐💐

मराठवाड़ा मुक्ति संग्राम !!

मराठवाड़ा मुक्ति संग्राम !! भारत स्वतंत्र झाला तरी नव्हतो आपण स्वतंत्र झालो, जुलमी निजामी सत्ता होती आपल्या सत्तेवर राज्य करत! सर्वत्र होता काळोख माजले होते स्तोम अन्याय, अत्याचार बलात्काराचे! घरे, दारे, जळाली पडला संसार उघड्यावर ! जाचक, जुलमी आटीने त्रासली होती भोळी जनता हृदय पिळवटुन टाकणारी होती क्रूर निजामी सत्ता !! अशाच काळोख्या वेळी उगवले तारे स्वातंत्र्याचे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राफ, बाबासाहेब परांजपे, गोविंदराव पानसरे असे कितीतरी स्वातंत्र्य जाणि उठले पेटुन आपल्या माय मराठी मराठवाडयासाठी! हजारोंच्या संखेने प्राणाची बाजी लावली, हुतात्मे झाले आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या दिव्य कार्याने दोनशे चोवीस वर्षांची गुलामगिरी मोडित काढली अन १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ति संग्रामाची सुवर्ण पहाट उगवली !! कोटि कोटि विनम्र अभिवादन त्या हुतात्म्यांच्या चरणी || कवि देविदास पांचाळ सर, सैनिक स्कूल, तुळजापुर, जिल्हा उस्मानाबाद ।

देविदास पांचाळ सर,
X