थोर शिक्षणतज्ञ - क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

सामाजिक न्याय आणि शैक्षणिक हक्कापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना, शूद्रांना शिक्षणातून जागृत करण्याचे महान कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा 3 जानेवारी जन्मदिवस यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख……!

आठराशे अठ्ठेचाळीसचा काळ भारताच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मानावा लागेल, कारण सामाजिक न्याय आणि हक्काबाबत अनेक चळवळीचा यावेळी प्रारंभ झाला होता .विशेषत: शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली स्थित्यंतरे महत्त्वाची मानली गेली. याकामी हिरोरीने पुढाकार घेऊन पुण्यात म . फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी भारतीय मुलींसाठी शाळा सुरू करून एक नवे युग सुरू केले. स्त्री शिक्षणात आमूलाग्र बदल करून युगस्त्री ठरल्या.अशा या क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा जन्म ३ जानेवार १८३१ साली झाला. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती. पुरुषप्रधान संस्कृतीच्या विळख्यात सापडलेल्या स्त्रियांना शिक्षणाचा कधी स्पर्श देखील झाला नव्हता. समाजात फक्त पुरुषांचे स्थान महत्त्वाचे होते. स्त्रियांच्या सन्मानाचा,सामर्थ्याचा व शक्तीचा, कृतीचा, बुद्धिमत्तेचा विचार केला जात नसे, स्त्रियांनी पायात जोडे वाहना घालणे अपवित्र मानले जायचे ,याशिवाय स्त्रियांना मोठ्याने बोलण्यास देखील मज्जाव होता. स्त्रीही दोषाची व अज्ञानाची खाण समजली जाई अशी समाजाची स्त्रियांबद्दल भावना होती.

याबरोबर समाजामध्ये जातीभेदाच्या गर्तेत सापडलेल्या माणसाला शूद्र मानून त्याला पशुतुल्य मिळत असलेली वागणूक सावित्रीबाईंनी जवळून पाहिली होती. आणि म्हणून अशा उपेक्षित स्त्री शूद्रांना त्यांच्यात आत्मभान व आत्मतत्व निर्माण करून द्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे मानून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी अलौकिक कार्य केलं. स्त्री दास्यत्वाला विरोध करून स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य सावित्रीबाईंनी केले .त्याची फलश्रुती म्हणजे आजच्या विज्ञान युगात स्त्रीयांच्या शिक्षणात होत असलेला अमुलाग्र बदल. स्त्री शिक्षणातून समग्र कुटुंबाचा व समाजाचा उद्धार होऊ शकतो हे त्यांनी ओळखलं होतं म्हणून ‘विद्या हेच धन आहे श्रेष्ठ ‘ हे वचन त्यांनी अंगीकारले होते. विद्या हे समाजजागृतीचे व समाजक्रांतीचे एक महत्त्वाचे साधन आहे असे मानून सावित्रीमाईनी जीवन कार्याची यशस्वी वाटचाल केली आणि म्हणून भारतीय स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या त्या क्रांतीज्योती ठरल्या.

शिक्षणाचे महत्त्व जाणून १ जानेवारी १८४८ रोजी सुरू करण्यात आलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करताना अनेक कष्ट सावित्रीबाईंना सहन करावे लागले .समाजातील विरोधकांच्या विचारांचा प्रतिकार करून त्यांनी आपल्या कार्याला गतिशील बनविले आहे. महात्मा फुले यांनी तयार केलेला अद्ययावत अभ्यासक्रम उत्तम रीतीने सावित्रीबाईंनी राबविला .हे कार्य करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात तुलनात्मक व प्रायोगिक काम करून काही महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितले .यामध्ये शिक्षणाच्या प्रगतीस परंपरा व परिस्थिती ही कारणीभूत होत आहे हे शिक्षणातले वास्तव त्यांनी शोधले होते. विद्यालय ही समाजजागृतीचे व समाजक्रांतीचे हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे म्हणून त्यांनी शिक्षण कार्यात प्राधान्याने लक्ष घातले होते विदयेने परिस्थितीवर मात करता येते हा शैक्षणिक विचार एक नवा विचार म्हणून मानला जातो.

भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, पहिली स्त्री शिक्षणतज्ञ, संशोधिका आणि शिक्षणक्षेत्रातील विचारवंत म्हणून सावित्रीबाईंचे कार्य अपूर्व व अलौकिक ठरते .प्राप्त परिस्थितीचा धाडसाने सामना करत समाजातील विविध आव्हानांना सामोरे जात सावित्रीबाईंनी आपले कार्य जिद्दीने, कळकळीने व कौशल्याने केले, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. सावित्रीबाई जन्मल्या म्हणून समाजात उपेक्षित जीवन जगणारी स्त्री ही निर्भय आणि स्वतंत्र होण्यास मदत झाली. त्यांनी समस्त स्त्रियांना निर्भय आणि स्वतंत्र करण्यास प्रेरणा दिली . त्या जन्मास आल्या नसत्या तर स्त्रिया कदाचित अद्यापही परावलंबि राहिल्या असत्या.

सावित्रीबाईंनी आपला ज्ञानयज्ञ यशस्वी केला आणि देशासमोर एक नवा आदर्श ठेवला. समाजातील उपेक्षित अशा स्त्रियांना व शूद्रांना ज्ञान देण्याचे कार्य त्यांनी कर्तव्यबुद्धीने, विलक्षण चिकाटीने पार पाडले आणि म्हणून समाजातील अज्ञानाचे अंधार कोपरे प्रकाशमान करण्याचं महन्मंगल कार्य त्यांनी केले. स्त्रियांना अस्मितेचा नवा चैतन्य स्पर्श देत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सामाजिक समतेसाठी संघर्ष उभा केला. अशा सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती म्हणून गौरविण्यात आले हा समस्त स्त्री जगताचा गौरवच म्हणावा लागेल.

लेखक : श्री स्वामी रमाकांत

सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.

प्राचार्यांनी घेतला वर्षभरातील - शाळेच्या कामाचा आढावा.

Principal : Ghodke V.B

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके सर यांनी विद्यालयात वर्षभर झालेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांसमोर ठेवली. जवळपास दीड तास त्यांनी विद्यालयाच्या विकासाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रम, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल, शालेय परिसर, स्वच्छता वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, सहशालेय विविध उपक्रम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल, रूमची स्वच्छता असेल, वस्तीग्रहाची स्वच्छता असेल, मेस विभागातील कामकाज असेल,

 विद्यार्थ्यांच्या भोजनाची दररोजची व्यवस्था, विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, तसेच रेक्टर, वॉर्डन व इतर कर्मचारी त्यांनी केलेले वर्षभरात उत्कृष्ट पद्धतीचे कार्य, तसेच वर्षभरात शिक्षकांनी केलेले उत्कृष्ट पद्धतीचे कार्य, स्कॉलरशिप ची परीक्षा असेल, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा असेल, चित्रकला एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा असेल, गांधी विचार मंच परीक्षा असेल, सामान्य ज्ञान परीक्षा असेल, विज्ञान मेळावा असेल, गणित प्रदर्शन असेल क्रीडा व सांस्कृतिक विभागातील विविध कार्यक्रम असतील, तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, तसेच राज्यस्तरावर गेलेल्या विद्यार्थ्यांचे व त्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. महान व्यक्तीच्या जयंत्या पुण्यतिथी कार्यक्रम असे, तसेच विद्यार्थ्यांचे सैनिकी परेड, पी टी, विविध प्रकारचे खेळ, योग प्राणायाम या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा विद्यार्थ्यांसमोर ठेवला.

आजपर्यंत शाळेने केलेली प्रगतीचा अहवाल मांडला विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी बक्षीसे ठेवली आहेत तसेच पालकांनीही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन पर बक्षीस ठेवलेली आहेत याची माहिती दिली त्याचप्रमाणे संस्थेने विद्यार्थ्यांसाठी काय काय योजना केलेल्या आहेत, कोणत्या प्रकारे नियोजन, गुणवत्ता वाढ, भौतिक सुविधा, क्रीडा सुविधा, साधने, संगणक कक्षातील साधने, तसेच अटल लॅब, एनसीसी विभाग, ई लर्निंग सुविधा, स्मार्ट बोर्ड या विविध योजनांचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. आजपर्यंत झालेली शाळेची प्रगती ही सर्व वरिष्ठांच्या आदेशानुसार, सर्व शिक्षक कर्मचारी, वस्तीगृहातील कर्मचारी, मेस विभागातील सर्व कर्मचारी व सर्वांच्या प्रयत्नामुळे, मेहनतीमुळे झालेली दिसून येते असे त्यांनी सांगितले.

तसेच शाळेत किंवा वस्तीगृहात शिस्तीचे व नियमाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सूचना देण्यात आल्या. अशा विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात येईल असेही सांगितले. पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या मीटिंगमध्येही या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला. नवीन वर्षात नवीन चांगले संकल्प करा अभ्यासावर भर द्या. भरपूर अभ्यास करा पुस्तक वाचा. वर्गातील स्मार्ट बोर्डचा अभ्यासासाठी फायदा घ्या. अशा विविध विषयावर जवळपास दीड तास मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी साठी व दहावीच्या नंतर विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज नाही कारण त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ऑनलाइन विविध प्रकारच्या क्लासेसची सुविधा, स्मार्ट बोर्ड, ई लर्निंग, आपल्या विद्यालयात मोफत केलेली आहे. विद्यार्थ्यांनी भली मोठी फीस भरून बाहेर न जाता आता विद्यालयातच सर्व क्लासेसची व्यवस्था मोफत केलेली आहे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचाही शब्दसुमनाने अभिनंदन करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त श्रीमान देविदास पांचाळ सर व श्रीमान तुषार सुत्रावे सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

विद्यालयातील मिलिंद मगर या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसाला एक वृक्ष शाळेला भेट दिलेले आहे व त्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा या अंतर्गत नियमितपणे शाळेची स्वच्छता राखली जाते. जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवीन संकल्प, नवीन विचार, नवीन उपक्रम, घेऊन जोमाने अभ्यासाला लागा असा सल्लाही त्यांनी दिला. देशासाठी शहीद झालेले जवान व त्यांच्या परिवारांना सहाय्यता करण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचारी व पालकाम तर्फे ही ध्वज निधी जमा करण्यात आला.

सर्वांना नवीन वर्ष सुखी समृद्धी आनंदी व भरभराटीचे जावो आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹

—————————————
संकलन – – देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल तुळजापूर जिल्हा धाराशिव.

 

नवीन वर्ष, नवे संकल्प – नवीन हे वर्ष सुखाचे जावो !
—————————–———-
करू या संकल्प नवीन वर्षाचा–
—————————————

मित्रांनो, दररोज चा दिवस येतो आणि जातो सर्वसामान्यांसाठी आपल्या दररोजच्या कामात दिवस कसा जातो हे कळतच नाही. दिवसा मागून दिवस जातात महिने जातात आणि वर्षही जातात बघा ना बघता बघता जुने वर्ष संपले आणि नवीन वर्षाला सुरुवात झाली. जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत ! करण्यासाठी हा वर्षातला शेवटचा महिना आणि त्यातला हा शेवटचा दिवस वर्षभरातला लेखाजोखा आपल्यासमोर ठेवा आणि वर्षभरात आपण काय चांगले काम केलेले आहे व काय आपल्या हातून वाईट घडलेले आहे याचा अभ्यास करा व नवीन वर्षात सर्व दुर्गुण बाजूला टाकून द्या. जीवनातला प्रत्येक दिवस हा नव्याने येतो. नवीन पहाट, नवीन सूर्य, नवीन चंद्र, नवीन निसर्ग, नवीन विचार, नवीन कल्पना घेऊन नवीन वर्ष येत असतो. येणारे प्रत्येक वर्ष हे नवीन असते आणि जाताना मात्र जुने होऊन जाते. गेलेलं वर्ष हे कसं गेलं हे आपल्याला कळलंच नाही. जसे की माणसाचा जन्म होतो, लहान बाळ ही मी लवकरात लवकर मोठा कसा होईल याची वाट पहात असते, नवनवीन गोष्टी, घडामोडी, नवीन माणसं, यांच्याशी ओळख करीत असते. आपला परिवार असेल, आप कुटुंब यांच्याशी सर्वप्रथम घट्ट ओळख करते. त्यानंतर मग बाहेरील व्यक्ती, शेजारीपाजारी यांची ओळख होते. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक व्यक्ती त्याला नवीन असते. नवीन व्यक्ती जवळ गेले की, ते प्रथम रडतच असते. परंतु नंतर सतत बघितल्यामुळे सवयीमुळे मात्र ते रडणं थांबवते. अगदी तसेच वर्ष येतात असे वर्ष निघून जातात आपण मात्र प्रत्येक पुढील वर्ष, पुढील काळ, पुढचा दिवस, येण्याची वाट बघत आलेला दिवस घालवत असतो. निसर्गाचे वेळापत्रक हे कधीही न बदलणारे व कधीही न संपणारे असते. सतत क्रिया घडत असतात.. सतत क्रिया चालूच असतात. सूर्य उगवतो सकाळ होते, दुपार होते आणि संध्याकाळही होते. पुन्हा नवीन दिवस उगवतो आणि आपण आपल्या नित्य कामाला लागतो.

सूर्य उगवतो, पक्षी किलबिल करतात, वारे वाहतात, नद्या वाहतात, मोटार गाड्या धावतात, रेल्वे, विमान, धावतात माणसे धावायाला लागतात. आपण मात्र या सगळ्या कामांमध्ये गुंतून जातो. जुन्या वर्षाने काय दिले याचा हिशोब करीत बसतो. किती फायदा झाला? काय काम केले? आपण किती घडलो बिघडलो? दुसऱ्याला किती घडवलं. नवीन वर्षात आपण सर्वांना काही तरी संकल्प केला पाहिजे. हल्ली लोक रस्त्याने सुद्धा नीट जात नाहीत. काहींना रस्त्याचे व वाहतुकीचे नियम माहिती नाहीत . काही लोकांना रस्त्याचे नियम पाळा म्हणून सारखे सांगावे लागते. रस्त्यावरून भरताव गाड्या चालवतात आणि आपल्याबरोबरच दुसऱ्याचही जीव संकटात आणतात अशा तरुणाईने आपल्या अशा वर्तनाला आळा घातला पाहिजे. व वाहतुकीच्या नियमाचे काटे कोरपणे पालन केलेच पाहिजे. जेणेकरून होणारे अपघात टळतील व शेकडो लोकांचे प्राण आपल्यामुळे वाचतील प्रथमतः हा संकल्प सर्वांनीच करणे गरजेचे आहे. नव्हे नव्हे केलाच पाहिजे! आरोग्य ही संपत्ती आहे. “आरोग्य सुदृढ राहणे म्हणजेच खरी श्रीमंती आहे, ही श्रीमंती जपली पाहिजे.” यासाठी सर्वांनी पहाटेचा सूर्योदय दररोज पाहिलाच पाहिजे. नित्यनेमाने पहाटे फिरायला जाणे, व्यायाम करणे, आळशी न बनता कार्यतत्पर होणे, वेळेच्या वेळी सर्व कामे करणे, आपल्यातील लोकांनी सांगितलेले दुर्गुण कमी करण्याचा निश्चय करणे, दुर्गुण व्यसन, दूर करणे सोडून देणे. शुद्ध आहार व सात्विक आहारच घेणे. पालेभाज्या व फळे खाणे. आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देणे त्यांच्या शिक्षणाकडे व त्यांना सुसंस्कारित करणे.

आपले कर्तव्य व आपली जबाबदारी पार पाडणे. धूम्रपान न करणे व आरोग्यास घातक, समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टीला आळा घालणे. सामाजिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, सार्वजनिक मालमत्ता आपली समजून त्याचे संरक्षण करणे, गड, किल्ले, बाग बगीचा, स्वच्छता व त्याचा सांभाळ करणे. आपल्या देशाचा गौरव होईल, मानसन्मान होईल असे कार्य करीत राहणे अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टी करण्याला पैसे लागत नाहीत. फक्त इच्छाशक्ती लागते. फक्त त्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा लागतो. मी माझ्या जीवनात एक तरी झाड लावले आहे का ? असा प्रश्न आपण स्वतःला विचारा. प्रश्न कडवट आहे आपल्याला प्रश्न ऐकून थोडासा रागही येईल परंतु सत्य व वास्तववादी आहे ! खरंतर वृक्षांची किंमत दुष्काळ पडल्यानंतर कळते, कडक अशा उन्हाळ्यात कळते, पिण्यासाठी पाणी मिळत नाही तेव्हा कळते, भर उन्हाळ्यात रण रणत्या उन्हात जेव्हा सूर्य आग ओकायला सुरुवात करतो. सारी तलाव, नद्या, धरण कोरड्या पडतात तेव्हा आपणा सर्वांना जाग येते. जेव्हा चिमणीलाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही अरे! आपल्या धरतीवर, परिसरात, पर्यावरणात झाडेच कमी झालेली आहेत! आपल्याला झाडे लावली पाहिजेत व त्यांचा सांभाळ केला पाहिजे. नवीन वर्षात पुस्तकांची वाचन वेळ वाढवा google आणि मोबाईल या सगळ्या तांत्रिक गोष्टी तांत्रिक साधने झाली आहेत. परंतु पुस्तके ही सजीव माणसांनी त्यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव मांडलेले असतात. वाचन केल्याने खरे ज्ञान, मूळ ज्ञान आपल्याला कळते. म्हणून वाचन वेड लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तकांना जपा, पुस्तकांना आपले मित्र माना, तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान असते त्याचा फक्त उपयोग काम करण्यासाठी होतो. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात या जाळ्यात फसू नका. माणसे माणसाला विसरत आहेत. माणसाला विसरू नका.

विज्ञान तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे परंतु तंत्रज्ञानात द्या, माया, माणुसकी, आपुलकी, प्रेम, आत्मीयता अशा भावभावना आपल्याला बघायला मिळत नाहीत ! किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या प्रेमाच्या गोष्टी, संस्कारांच्या गोष्टी, आपल्याला मिळत नाहीत. कधी आपण रक्तदान केलंय का ? असाही प्रश्न स्वतःला विचारा. सर्वात मोठे दान महादान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रक्तदान करा रक्तदान करणे सर्वात चांगले मोठे पुण्य लाभणारे दान आहे. अचानक आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला रक्त कोण देणार ? का देणार ? आणि का द्यावे ? असे प्रश्न भविष्यात निर्माण होतात. हे आपण कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे . म्हणून अशा गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी हितकारक आहेत. ज्या समाजासाठी हितकारक आहेत. ज्या देशासाठी हितकारक आहेत. नवीन वर्षात असाच संकल्प करा जेणेकरून देशाची प्रगती साध्य होईल.
————————————— माननीय संपादक व सर्व संपादक मंडळ तसेच सर्व वाचकांना व मान्यवरांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻 नूतन वर्षाभिनंदन !

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.

Student-Teacher Relationship Importance.

Student-Teacher Relationship Importance.

The relationship between student and teacher is a crucial aspect of the education system. As a student, you spend a significant amount of time with your teachers, and they have a profound impact on your personal and academic development. In this blog, we will explore the student-teacher relationship, its importance, and how it can be strengthened.

Importance of a Strong Student-Teacher Relationship

A strong student-teacher relationship has numerous benefits for both students and teachers. Firstly, it creates a positive learning environment where students feel comfortable asking questions, sharing their opinions, and taking risks. When students feel comfortable in the classroom, they are more likely to participate in discussions and engage in the learning process actively.

Secondly, a strong student-teacher relationship improves academic performance. Teachers who have a good rapport with their students can identify their strengths and weaknesses, tailor their teaching style, and provide personalized instruction. Additionally, students who have a positive relationship with their teachers are more likely to attend classes, complete assignments, and perform well on assessments.

Finally, a strong student-teacher relationship can have a positive impact on the student’s social and emotional development. Teachers who show empathy and understanding towards their students can help build their self-esteem, encourage positive behavior, and support their mental health.

Ways to Strengthen the Student-Teacher Relationship

Get to know your teacher: Students should take the initiative to get to know their teachers beyond the classroom. By understanding their teacher’s interests, hobbies, and teaching style, students can establish a more personal connection with their teacher.

Communicate effectively: Effective communication is key to building a strong student-teacher relationship. Students should feel comfortable sharing their thoughts and concerns with their teachers, and teachers should listen and provide constructive feedback.

Show appreciation: Students should show their appreciation for their teachers’ hard work and dedication by thanking them for their efforts, showing up on time to class, and completing assignments to the best of their ability.

Attend extra-curricular activities: Students should attend extra-curricular activities such as sports games, performances, and club meetings. By showing support for their teachers outside of the classroom, students can establish a deeper connection with them.

Collaborate: Teachers and students should work together to create a positive learning environment. Teachers should encourage student input, involve students in decision-making, and incorporate their interests into the curriculum.

In conclusion, a strong student-teacher relationship is crucial to academic success, personal growth, and overall well-being. By taking the initiative to get to know their teachers, communicating effectively, showing appreciation, attending extra-curricular activities, and collaborating, students can establish a meaningful and positive relationship with their teachers.

Writer: Shri Sutrave T.V (Asst.Teacher Shri Tuljabhavani Sainik School, Tuljapur)

जागतिक अहिंसा दिन !

          स्वच्छतेचे पुजारी  – – बापूजी 

            राष्ट्रपिता महात्मा गांधीजी

————————————— मित्रांनो आज 2 ऑक्टोबर  भारताच्या दोन महान रत्नांची जयंती राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती दोन्ही महान नेत्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन! 

 भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेतृत्व, एक महान व थोर व्यक्तिमत्व, राजकीय तत्त्ववेत्ते, जगाला सत्य अहिंसा परमो धर्म हा मंत्र देणारे, सर्वांचे लाडके, आवडते, राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधीजी होय. आदराने लोक त्यांना बापू म्हणत असत. आज आपण महात्मा गांधीजींच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. “सत्यम शिवम सुंदर, सत्य हेच ईश्वर आहे!” म्हणून प्रत्येकाने सत्याने वागले पाहिजे. असत्य किंवा” खोटे बोलणे हे सर्वात मोठे पाप आहे!” असे गांधीजी नेहमी सांगत असत. “दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल!” असे गांधीजी बद्दल वर्णन केले जाते. शेवटपर्यंत अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई  लढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हिंसा गांधीजींना मान्य नव्हती. ते नेहमी म्हणत असत कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नये, मुक्या प्राण्यांची सेवा करावी. प्राणी पाळावेत परंतु त्यांची हिंसा करू नये, त्याचे हत्या करू नये माणसाकडे हिंसा वृत्ती नसावी. पशुवृत्ती नसावी तर माणसाकडे माणुसकी असावी. हाच संदेश त्यांनी जगाला दिला. आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त गांधीजींच्या जीवन कार्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आजच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन! तसेच गांधी जयंती निमित्त आपणा सर्व वाचकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा! गांधीजींनी तरुणांसाठी एक मंत्र दिला तो म्हणजे स्वावलंबन प्रत्येकाने स्वावलंबी बनले पाहिजे. नवयुवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.

त्यांची संकल्पना शिक्षण आणि काम दोन्ही एकाच वेळी झाले पाहिजे. कामातून शिक्षण आणि शिक्षणातून काम आणि कामातून आर्थिक लाभ अशी त्यांची संकल्पना होती. म्हणूनच त्यांनी खेडेगाव स्वयंपूर्ण झाले पाहिजे, त्या काळात त्यांनी खेड्याकडे चला, खेडे जागृत करा खेडे स्वावलंबी बनवा, खेड्यातील बारा  बलुतेदारांना मान सन्मान द्या. त्यांच्या कार्याचा गौरव करा व त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या वस्तूंचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर करा. खेडेगावांमधून लघुउद्योग करता येतील या लघुउद्योगांमधून मोठमोठे उद्योग सुरू करता येतील. म्हणून त्यांनी त्यावेळी असा संदेश दिला खेडी हे स्वयंपूर्ण झाले पाहिजेत. म्हणून खेड्याकडे चला असा संदेशही त्यांनी दिला होता. त्याचबरोबर गांधीजी हे स्वच्छतेचे पुजारी होते. त्यांनी स्वच्छतेचा मंत्र फक्त भारतवासी यांनाच नव्हे तर  संपूर्ण जगाला दिला. स्वच्छता हे जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे स्वच्छता जिथे जिथे लक्ष्मी तिथे वसे असे त्यांचे मत होते. म्हणून ते प्रत्येक बाबीत स्वच्छतेला महत्त्व देत असत. घराची स्वच्छता असेल, आश्रमाची स्वच्छता असेल, शाळेची स्वच्छता असेल, गावाची स्वच्छता असेल याकडे ते संपूर्ण लक्ष देत असत व स्वतः हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचे काम करीत असत. कामामध्ये कुठलाही भेदाभेद नसतो.  कोणतेही काम हे लहान आणि मोठे असे नसते काम हीच पूजा असते. सर्व धर्मासमभाव मानणारे गांधीजी होते. सर्व धर्मीयांना समान हक्क मिळाला पाहिजे, समान न्याय मिळाला पाहिजे व त्यांना आपल्या कर्तव्याची समान माहिती मिळाली पाहिजे. आपला भारत देश विविध जाती, धर्म संप्रदाय व अठरापगड जातीने बनलेला आहे. तरीही आपल्या देशातील लोक सुजाण समजदार व एकतेने राहतात हे भारतीयांचे खास वैशिष्ट्य आहे. भारतात एकता नांदो हीच भावना गांधीजींची होती. गांधीजींचे खास वैशिष्ट्य म्हणजे गांधीजी  प्रातःकाळी चार वाजता उठत असत व व्यायाम शाळेत जात असत. दररोज नित्यनेमाने व्यायाम शाळेत जाणे व तिथे व्यायाम करणे, योगा करणे, याला खूप महत्त्व देत असत. गांधीजी नेहमी म्हणत” आरोग्य हीच संपत्ती आहे” ही संपत्ती आपल्याला सांभाळायची असेल तर दररोज पहाटे उठून व्यायाम केलाच पाहिजे. त्याचबरोबर गांधीजी वेळेला खूप महत्त्व देत  असत. आपल्या जीवनातील क्षण ना क्षण अत्यंत मोलाचा आहे, त्या क्षणाचा आपण सदुपयोग केला पाहिजे. योग्य वेळी योग्य काम करता आले पाहिजे. प्रत्येक काम ते ठरलेल्या वेळेत करत असत व स्वतःची सर्व कामे स्वतः करीत असत हे त्यांच्या चरित्राचे खास वैशिष्ट्य सांगता येईल. गांधीजी म्हणत विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे अत्यंत सुंदर असले पाहिजे. सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा खरा दागिना आहे! त्यासाठी सातत्याने लेखन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी अनमोल असा संदेश गांधीजींनी त्यावेळी दिलेला होता. ते म्हणत खराब अक्षर म्हणजे अज्ञानाची निशाणी असते, खराब अक्षराने आपले अज्ञान उघडे पडते. आपल्या हस्ताक्षरावरून माणसे ओळखली जातात, माणसाचा स्वभाव ओळखला जातो.

दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा लढा असेल, 1942 चे स्वातंत्र्य आंदोलन असेल, अंग्रेजो चले जाव ची घोषणा असेल, दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, अशा अनेक उठावातून गांधीजींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले! आणि शेवटी त्यांच्या अमूल्य अशा कार्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे, देशासाठी बलिदान देणारे, सर्वांचे राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधीजी होय. “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” मानून त्यांनी दीन, दलित, गोर, गरीब, दुबळे,  अशा लोकांसाठी  आधार बनून अशा लोकांचे भरपूर सेवा केली. एवढेच नव्हे तर त्यानी कुष्ठरोगी यांची मनोभावे सेवा केली. स्वदेशी कपडे वापरले पाहिजे यासाठी आपल्या देशात कापडाचे उत्पादन झाले पाहिजे म्हणून त्यांनी चरखा व सुतकताई सुरू केली. गांधीजी स्वतः चरख्यावर सूत कातत असत. त्या सुतापासून कापड तयार होत असे हे कापड आपल्या देशातच तयार झाले पाहिजे व आपल्या सर्व देशवासीयांना कपडा मिळाला पाहिजे. अशीच त्यांची भावना होती आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या देशातील लोकांच्या गरिबीची जाणीव झाल्यामुळे, दारिद्र्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी  धोती व पंचाच नेसायचे ठरवले व तेव्हापासून ते फक्त धोती आणि पंचा वापरू लागले! आपल्या देशावरील प्रेम, लोकांवरील प्रेम, लोकांचा विश्वास व गांधीजींचे कार्य अ वर्णनीय होते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील ते एक सोन्याचे पान होते अशा महान महात्म्याला आज जयंतीदिनी पुन्हा एकदा कोटी कोटी विनम्र अभिवादन! 

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.

 

How to study hard for cracking competitive exam

1) Studying for a competitive exam requires a lot of hard work, dedication, and discipline. Here are some tips to help you study effectively:

2) Create a study plan: Develop a study plan that includes a realistic schedule that covers all the subjects and topics you need to prepare for the exam. Break down the plan into manageable study sessions and allocate sufficient time for each subject.

2)  Know the exam pattern: Knowing the exam pattern and the type of questions that will be asked can help you focus your preparation and study more efficiently.

3) Practice previous year’s papers: Solving previous year’s papers will give you an idea about the type of questions that are asked in the exam and the level of difficulty.

4) Study in a distraction-free environment: Create a quiet, comfortable, and distraction-free study environment. Turn off your phone, social media, and other potential distractions.

5)  Take breaks: Taking short breaks between study sessions can help you recharge and stay focused.

6) Focus on weak areas: Identify your weak areas and focus on improving them. Spend more time on difficult topics and take help from teachers, mentors, or study groups if needed.

7) Stay healthy: Staying healthy is crucial during exam preparation. Eat nutritious food, get enough sleep, and exercise regularly to maintain your physical and mental health.

8) Stay motivated: Keep yourself motivated by setting achievable goals and rewarding yourself when you achieve them. Stay positive, and believe in your abilities to crack the exam.

Tushar Shalini Vishwanathrao Sutrave
Asst. Teacher
Shri Tuljabhavani Sainiki School, Tuljapur.

कष्टाला पर्याय नाही, अन कष्टाविना फळ नाही ! ध्येय ठरवा व त्याचा पाठलाग करीत मार्ग शोधा.

मित्रांनो, आपले जीवन जगत असताना आपणा सर्वांना कष्ट करावेच लागते. जो कष्ट करतो, मेहनत करतो, त्याला यश प्राप्ती होते. प्रत्येक जण आपापल्या परीने सामाजिक कामे करत असतात. आपला प्रपंच चालवण्यासाठी आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाला काही ना काही कार्य करावेच लागते. फक्त काहीजण शारीरिक कष्टाची कामे करतात तर काहीजण बौद्धिक स्वरूपाची कामे करतात.

शारीरिक कष्टाची कामे केल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहते. जगात कष्टाला  दुसरा पर्याय नाही. आपणाला जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल, प्रगती साधायचे असेल, ध्येय गाठायचे असेल तर कष्ट केलेच पाहिजे. रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्याला कष्टापासून आनंद मिळतो. आनंदामुळे रात्री झोप शांत लागते. झोप पुरेशी मिळाल्यामुळे आरोग्य निरोगी राहते सुदृढ राहते. आरोग्य निरोगी राहिल्यामुळे आळस झटकून जातो व शरीर हलके हलके व चपळ होते. मन स्थिर होते, चंचल होते व मेंदू सतत क्रियाशील होतो. म्हणून सतत कष्ट करीत राहणे कार्य करीत राहणे हे माणसाचे आद्य कर्तव्य आहे. पूर्वीच्या काळी सर्वांनाच खूप कष्टाची कामे होती. महिला व पुरुष दोघांनाही शारीरिक कष्टाची कामे होती .दूर दुरून कमरेवर, डोक्यावर पाण्याच्या घागरी आणणे, विहिरीतून पाणी शेंदणे ,चुलीवर स्वयंपाक तयार करणे, लाकडे, जाळ ,तवा चुलीतील धूर, तसेच पितळी, लोखंडि व तांब्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. शेताला चालत जाणे व चालत येणे तसेच पुरुषांसाठी बैलगाडी, नांगरनि, कुळवणि, खुरपनी, विहिरीतून मोटे ने पाणी काढणे व शेतातील पिकांना पाणी देणे ही सगळी  कष्टाची कामे होती. परंतु आज आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.

या तंत्रज्ञानामुळे पन्नास  टक्के कामे कमी झालेली आहेत. शेतीतील सगळी कामे यंत्रावर होत आहेत, कष्टाची कामे जास्तीत जास्त केल्यामुळे पूर्वीच्या लोकांचे आरोग्य आजही ठणठणीत व सुदृढ दिसून येते. श्रम प्रतिष्ठा हा शब्द आपण नेहमी ऐकलेला आहे. जो श्रम करतो, मेहनत करतो, प्रामाणिकपणे श्रम करतो त्याला प्रतिष्ठा आपोआप प्राप्त होते. समाजात मान मिळतो, सन्मान मिळतो एवढेच नव्हे तर त्याला उच्च पद देखील मिळते. काही जण मेहनत कष्ट बाजूला ठेवतात व नशिबावर भार ठेवतात! माझे नशीब असेल. माझ्या नशिबात एवढेच असेल! माझे नशीब असेच असेल, म्हणून थांबतात प्रयत्न सोडून देतात, जिद्द सोडून देतात. पण तसे न करता अविरत परिश्रम करत राहिले पाहिजे. हातावरच्या रेषांमध्ये दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा! हे भविष्य आपल्याला घडवता येते. आपले भविष्य कसे घडवायचे आपल्या हाती आहे.

महाभारतात भगवान श्रीकृष्णाने देखील सांगितलेले आहे कष्ट करीत रहा फळाची अपेक्षा करू नका. कारण फळ आपोआप आपल्याला मिळणारच असते. कष्ट आणि फळ या एकाच  नाण्याच्या दोन  दोन बाजू आहेत. एका बाजूला प्रामाणिक कष्ट तर दुसऱ्या बाजूला त्याचे यथोचित फळ ठरलेलेच असते! विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम ध्येय ठरवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवले पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत कोणता मार्ग जातो तो मार्गही अभ्यासला पाहिजे. कधी कधी मुले ध्येय मोठे ठरवतात पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सापडत नाही! नवीन पिढीतील विद्यार्थी नवयुवकांनी ध्येय ठरवा पण ते ध्येय आपल्या   आवाक्या बाहेरचे असू नये!  आपल्या ध्येयामुळे आपले घर, परिवार, किंवा माता, पिता यांना त्रास ही होणार नाही आणि ध्येयही प्राप्त होईल. असा मार्ग निवडा. यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा काटेरी स्वरूपाचा असतो. संकटाचा असतो, धोकादायक असतो. तेव्हा त्या मार्गाचा पूर्ण अभ्यास करा. बारकाईने चिंतन करा. पूर्वी त्या मार्गावरून कोण कोण पुढे गेलेले आहेत व कसे गेलेले आहेत ते शोधा. त्याचा अभ्यास करा व मार्गस्थ व्हा. असा जगात कुठलाही मार्ग नाही की, ज्या मार्गावर पूर्वी कोणीतरी गेलेले नाही.

जीवनात कष्ट हे योग्य दिशेने झाले पाहिजेत. तरच त्या कष्टाचे चीज होईल. नाहीतर मग कष्ट मेहनत एका बाजूला आणि ध्येयापर्यंत जाण्याचा रस्ता दुसऱ्या बाजूला ! काही लोकांना जीवनातील खरी दिशा कधीच कळत नाही! जीवनातील अमूल्य वेळ वाया जातो, संधी निघून जाते, काय  शिकायचं  ते राहून जातं. वेळ निघून गेल्यानंतर माणसाला जाग येते. आळशीपणामुळे बाहेरील ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आळशीपणा सोडला की, कष्टाळूपणा सुरू होतो. कष्टाळूपणा सुरू झाला की, यशाची वाट आपोआप दिसू लागते. जे आपण ठरवलेली आहे. मग आपण त्या रस्त्याने हळूहळू, हळू पुढे जाऊ लागतो. कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द पाहायचे असेल तर आपण मधमाशांचे उदाहरण घेऊ या. मधमाशी किती छोटी, किती लहान, तिचे हात, पाय, पोट, तिच्या पोटाला किती खायला लागत असेल ? निरीक्षण करा. तिची बुद्धी व बुद्धी कौशल्य उघड्या डोळ्यांनी बघितले तर खरे कष्ट आपल्याला दिसून येतील. मधमाशी मधाचे पोळे कसे तयार करते व त्यात मधुर रस विविध प्रकारच्या फुलांचा मकरंद कसा गोळा करते. त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी, एकता एकजूट, पाहून आपण नक्कीच थक थक्क व्हाल! तसेच कष्टाचे दुसरे उदाहरण आपल्या घरातील छोट्या मुंग्यांकडे पहा. मुंग्या दिवस रात्र आपापल्या कामात व्यस्त असतात. सतत चालत राहणे व मार्ग क्रमण करणे, वाटेत भेटेल त्याला मदत करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य!! आपल्याला पाहता येईल. आपण आपल्या जीवनात देखील मधमाशी सारखे सतत प्रयत्नशील व मुंग्यासारखे सतत चालत राहणे महत्त्वाचे आहे. सतत कार्य करीत राहिल्याने आपले ध्येय हळूहळू हळूहळू जवळ येते व आपण एक दिवस नक्की ध्येयापर्यंत पोहोचतो . 

लेखक

—————————————

 श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. 19 Feb.2023

महाराष्ट्राचे आराध्य दैवत!
—————————————
उत्कृष्ट व्यवस्थापक व आदर्श नियोजन कर्ते!!
—————————————
मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिन!! शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. ज्यांनी बाल सवंगड्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रायरेश्वराच्या मंदिरात आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला व हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली!! सर्व बाल मावळ्यांना एकत्र करून हिंदुत्वाची शक्ती एकत्र केली. आणि स्वराज्याची शपथ पूर्ण केली. असे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती निमित्त या शूर, वीर, धाडसी व जाणता राजास कोटी कोटी विनम्र अभिवादन !! शिव जयंती ही संपूर्ण देशभर मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केली जाते. महाराजांचे कार्य, महाराजांचे थोरवि, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वाऱ्यासारखी पसरली! महाराजांनी ताब्यात घेतलेले किल्ले, महाराजांचा गनिमी कावा, महाराजांचे प्रत्येक गोष्टीतील त्या वेळचे नियोजन, अत्यंत आदर्श व उत्कृष्ट पद्धतीचे होते. त्यांच्या नियोजनाचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडतात. त्यांच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम जनतेचा, रयतेचा विचार केला जात असे. शेतकरी असेल, मजूर वर्ग असेल, किंवा दीन, दलित, गरीब व गरजू लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी विचार होत असे. व त्यावर कृती होत असे. म्हणजे ती बाब लगेच अमलात आणत असत. अखंड कल्याणकारी राज्य निर्माण झाले पाहिजे ही त्यांची इच्छा, राजमाता जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्वाचे कार्य महाराजांनी केले. व सर्वांना समान न्याय मिळत असे. तसेच हाताला काम व कामाप्रमाणे दाम अशी त्यांची विचारसरणी होती. जाती धर्म, पंथ, संप्रदाय याच्याही पलीकडे जाऊन चांगला माणूस व माणुसकी त्यांनी जगाला दाखवून दिले. प्रत्येक बाबीचे नियोजन त्यांच्याकडे होते म्हणून त्यांना मॅनेजमेंट ऑफ द गुरु असे संबोधले जाते. पर स्त्री माते समान मानणारे, स्त्रीला आदर्श मानणारे, स्त्रियांचा सन्मान करणारे व समाजात उच्च नीच ता न मानता सर्व धर्म समभाव दर्शविणारे असे विश्ववंदनीय छत्रपती होते. युद्धातील नियोजन, महाराजांचे गड किल्ल्यावरील नियोजन, गड किल्ल्यावरील पाण्याची व्यवस्था, गड किल्ल्यावरील बाजारपेठ, गड किल्ल्यावरील वस्ती, गड किल्ल्यावरील खाण्यापिण्याची व्यवस्था, गडावरील घोड्यांची व्यवस्था, गडावरील रस्ते, रस्त्याची स्वच्छता, एवढेच नव्हे तर त्या काळातील रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या नाल्या, त्या काळातील बाथरूम व टॉयलेटची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली दिसून येते. महाराजांचे सर्व धर्मीयावरील प्रेम, महाराजांचा फौज फाटा, महाराजांच्या सैन्यातील विश्वासू सैनिक, जीवाला जीव देणारे सैनिक, महाराजांच्या प्रत्येक विभागाचे प्रामाणिक इमानदार सैनिक, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, महाराजांचे गुरु कोण होते, महाराजांनी येणाऱ्या संकटाचा सामना कसा केला महाराजांची विचारशक्ती, बुद्धी कौशल्य, श्रम प्रतिष्ठा, स्वराज्यावरील नितांत प्रेम राष्ट्रावरील प्रेम, जनतेवरील प्रेम, महाराजाचि कडक शिस्त, नियम, कायदे कानून, तसेच त्यांचे मात्र पित्र प्रेम, त्यांचे मुलावरील प्रेम, अ वर्णनीय आहे त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. थोडक्यात माहिती घेऊया. छत्रपती शिवराय म्हणजे आपला जीव की प्राण!! देशाचा मान, महाराष्ट्राचे गौरव महाराष्ट्राचे आद्य दैवत म्हणून ओळखले जाणारे ज्यांच्या नावाचा उच्चार करताच आपल्या अंगामध्ये शक्तीसंचारते प्रेरणा उत्साह राष्ट्र प्रेम संचारते आपल्या शरीरातील राष्ट्राप्रती असलेल्या भावना उफाळून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच ढाल, तलवार,भाले, गड, किल्ले, लढाई, त्यांचे शूर वीर मावळे, ज्यांनी आपल्याला शून्यातून महाराष्ट्राचि निर्मिती करून दिली. महाराष्ट्र निर्माण केला. जाचक, जुलमी, अन्याय अत्याचारी अशा मुगल औरंगजेब, सत्तेला उलथून पाडले. त्यांची सत्ता संपुष्टात आणली व आपले स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचे सुराज्य बनवले . हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. बालसंवगडी एकत्र केले. एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, वात्सल्याची भावना निर्माण केली. जाती, धर्म, पंथाचा लवलेशही नव्हता. मनामनात फक्त प्रेम होते. स्वदेशी प्रेम, स्वराज्याचे प्रेम, स्वराज्य निर्माण करणे, स्वराज्याची स्थापना करणे, अन्यायी अत्याचारी सत्तेला उलथवून लावणे हेच मोठे ध्येय होते. बालपणीच त्यांच्यावर संस्कार घडवले ते माता जिजाऊ राजमाता जिजाऊने. त्यांच्यावर सुसंस्कार घडवले. शूर वीर, धाडसी पणा, मुत्सद्दीपणा, जिद्दी, चतुर, मोठ्यांचा आदर मान सन्मान करणे, शत्रूचा डाव ओळखणे, आपल्यासमोरील शत्रू ओळखणे, आपले कोण ? शत्रू कोण? ओळखणे व त्यासोबत व्यवहार करणे. ही शिकवण त्यांना बालपणापासूनच मिळालि. त्यांच्या शौर्याची गाथा आपण लहानपणापासून ऐकत व वाचत आलेलो आहोत. कमीत कमी सैन्य घेऊन बलाढ्य अशा शत्रूला चकवा देऊन हरवणे व युद्ध जिंकणे ही त्यांची रणनिती, कसंब होती. ती आज पर्यंत कोणालाही जमली नाही. यालाच महाराजांचा गनिमी कावा असे म्हणतात. महाराजांच्या या गुणवैशिष्टाचे वर्णन कौतुक शत्रूलाही करावे लागले. याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. महाराजांनी जवळजवळ साडेतीनशे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. किल्ल्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर प्रत्येक किल्ला हा सुरक्षित स्थान, डोंगर कपारीवर बांधण्यात आला होता. शेकडो वर्षे झाली तरी किल्ल्याचे बांधकाम आणखी जसेच्या तसे दिसून येते. सुरक्षिततेसाठी भुईकोट किल्ले जलदुर्ग बनवण्यात आले होते . प्रत्येक किल्ल्याचे विशेष बाब म्हणजे त्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार कोणालाही कुठूनही दिसत नाही!! कितीही शत्रू जवळ आला तरी त्याला किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत नाही!! अशी त्यांनी त्यांची रचना केलेली आहे. विशेष म्हणजे इतक्या उंचीवर आजही पाण्याचे स्त्रोत दिसून येतात!! प्रत्येक किल्ल्यावर आजही पाण्याची व्यवस्था आपल्याला दिसून येते कडक अशा उन्हाळ्यात देखील गडावर शुद्ध असे पाण्याची व्यवस्था दिसून येते. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले दिसून येते. महाराजांच्या इतिहासातील आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, अफजलखानाचा वध, आशा अनेक घटना आपल्याला त्यांच्या शौर्याची, गनिमी काव्याची, त्यांच्या कौशल्यचि, त्यांच्या नियोजनाचि आठवण करून देतात. महाराजांच्या अशा विलक्षण व अद्भुत कार्यास शतशः नमन

लेखक
—————————————
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या मनामनात व हृदयात आहेत. त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच युद्धाचे प्रसंग ऐकून आपल्या अंगावर शहारे येतात. जुलमी, जाचक, अन्याय, अत्याचारी मुघलांचे सत्ता, औरंगजेबाची सत्ता उलथून पाडण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. आजच्या आधुनिक युगात नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र, तसेच त्यांचे कार्य, त्यांचे गड किल्ले, त्यांच्या जीवनातील प्रत्येक वेळी केलेले नियोजन, व्यवस्थापन, अत्यंत पारदर्शक व निरीक्षण करण्यासारखे आहे. त्यातून आपल्या नवीन पिढीला खूप खूप अशी प्रेरणा मिळते. जगातील संपूर्ण इतिहासकारांनी त्यांच्या नियोजनाचे, त्यांच्या कार्याचे, त्यांच्या युद्धनीतीचे अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णन कौतुक केलेले आहे!! म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराज आपणा सर्वांना विश्ववंदनीय आहेत!.

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

26 Jan 2023

Repulic Day Parade 2023

आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ! प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! प्रजासत्ताक दिनानिमित्त मला आवडलेली माझी शाळा किती सुंदर आहे व माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी कशाप्रकारे शिक्षण घेतात, विद्यार्थी कसे घडतात? विद्यार्थ्यांना कसे घडवले जाते? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो? व निवासी शाळेत विद्यार्थी कशा पद्धतीने जीवन जगतात. स्वावलंबी, स्वयंशिस्त, धाडसीपणा, नेतृत्वगुण याचा विकास कसा साधला जातो याचा थोडक्यात घेतलेला आढावा. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सैनिकी शाळा दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज सैनिकी शाळा चालू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी सैनिकी शाळा ही त्यातील एक शाळा आहे. थोडक्यात जाणून घेऊ या.
—————————————
माझी शाळा सुंदर शाळा,
—————————————
लाविते लळा, जसा माऊली बाळा !
————————————
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
—————————————

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन तुळजापूर नगरीत तुळजापूर शहराच्या दक्षिणेस बालाघाट पर्वताच्या रांगेवर टुमदार भव्य व सुंदर अशी इमारत उभी असलेली दिसते. आपले लक्ष वेधून घेते ती तीच माझी सुंदर शाळा!! श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर आहे. 15 ऑगस्ट 1996 ची स्थापना. आज रोजी शाळेला 25 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्षात पदार्पण केलेली शाळा! सुरुवातीला इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीत शाळा भरत असे. निवासी असल्यामुळे मुलांना इथेच राहावे लागते. निवासस्थान वस्तीगृह, एका बाजूला, भोजन कक्ष एका बाजूला तर शाळेचे वर्ग एका बाजूला असे दूर दूर अंतरावर विद्यार्थी शिक्षण घेत असत! पक्की इमारत नव्हती. पिण्याच्या पाण्याचा अभाव होता. अशा परिस्थितीत ही मुलांनी शिक्षण घेऊन आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उच्च उच्च पदस्थ झालेली आहेत. “इवलेसे रोप लावियेले द्वारि तयाचा वेलू गेला गगनावरी.” 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर, कष्टानंतर कमीत कमी कर्मचारी शिक्षक वर्ग हाताशी घेऊन श्रीमान घोडके सरांनी मुख्याध्यापक ते प्राचार्यांची धुरा सांभाळली. व आज तागायत सांभाळत आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर पसरलेली आहे.” विद्या बलंच उपासस्व” हे ब्रीदवाक्य घेऊन विद्यार्थ्यांना सैनिक बनवण्याचे वचन घेऊन सर्व कर्मचारी शिक्षक वर्ग जीव तोडून कामाला लागले. व सर्वांच्या कष्टाने, विद्यार्थ्यांच्या मेहनतीने इमारत फळा आली. प्राचार्यांनी शाळा म्हणजे आपले घर, पवित्र मंदिर समजून विद्यार्थ्यांची सेवा करण्याचे व्रत घेतले! व वाटचालीस लागले. आज रोजी शाळेची भव्य व सुंदर अशी दोन मजली इमारत उभी राहिलेली दिसून येते. अगदी शाळेच्या पुढ्यात दुतर्फा हिरवीगार हिरवळ, लॉन दिसून येते. याच हिरवळीवर शाळेतील छोटी छोटी मुले विविध खेळ खेळतात. पालक आपल्या पाल्यांच्या भेटीला आल्यानंतर लॉन मध्ये बसून जेवण करतात. भोजन करतात व विश्रांती घेतात. दोन्ही लॉनच्या मध्यभागी छोटासा रस्ता बनवलेला आहे. त्या रस्त्यावर सिमेंट ची छोटी, छोटी ठोकळे बसवलेली आहेत. पुढे रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच बांबूची झाडे आहेत. पुढे गेल्यावर सुरक्षारक्षकांची केबिन दिसते. सर्वत्र हिरविगार झाडी दिसून येते. शाळेच्या आतील मैदानात हरित सेनेच्या माध्यमातून बॉटनिकल गार्डन तयार केलेली आहे. या गार्डनमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती सौंदर्य फुलांची झाडी आहेत. शाळेच्या समोरच भव्य असे क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावर विद्यार्थी विविध प्रकारचे खेळ आनंदाने खेळतात परेड, विद्यार्थ्यांचे संचलन याच ग्राउंडवर होते. शाळेच्या अवतीभवती विविध फळांची व फुलांची झाडे लावलेली आहेत. लिंबू, आंबा, चिंच, अशोकाची, झाडे चाफा, गुलाब, नारळ, बाभळी, अशी अनेक झाडे पाहायला मिळतात. हे प्रत्येक झाड विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट म्हणून दिलेली आहेत. आज पर्यंत शाळेच्या अवतीभवती हजारो झाडांची लागवड केलेली आहे! व आज रोजी या सर्व झाडांनी शाळेचे सौंदर्य वाढवलेले आहे. प्रातःकाळी साडेपाच वाजल्यापासून चिमुकल्या या चिमण्या पाखरांचा चिवचिवाट सुरू होतो. सर्व मुले तयार होऊन व्यायाम, परेड, योगासन, धावणे यासाठी क्रीडांगणावर दाखल होतात व प्रत्येक वर्गाची तुकडी आपापल्या दिशेने व्यायामास लागते. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे प्रशिक्षक त्यांच्या सोबतच असतात. शाळेत विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातात. वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर, उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाण्याची सोय, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, विविध स्पर्धा परीक्षा, तसेच एनडीए परीक्षेची तयारी करून घेतली जाते. प्रत्येक वर्गात डिजिटल स्मार्ट क्लास सुरू झालेला आहे. अध्यापनात सर्व शिक्षक डिजिटल माध्यमाचा उपयोग करतात. त्यामुळे नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शाळेची शैक्षणिक सहल काढली जाते, विद्यार्थ्यांना भौगोलिक क्षेत्राचे ज्ञान व्हावे, विविध राज्यांची, किल्ल्यांची, नद्यांची माहिती व्हावी,यासाठी ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातात. तसेच विद्यालयात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडला जातो. स्नेहसंमेलनानिमित्त पालकांच्या गाठीभेटी घेणे, तसेच विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रत्येक वर्गाच्या स्वतंत्र अशा पालक मीटिंग घेतल्या जातात व त्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी प्रगती विषयी चर्चा केली जाते. पालकांसोबत चर्चा केली जाते. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्यासाठी ऍरोचे पाणी दिले जाते. तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विद्यालयाने उत्तुंग यश प्राप्त केलेले आहे. राज्यस्तरावर तसेच देश पातळीवर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. या सर्व प्रगतीच्या मागे शाळेच्या वरिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. माझी शाळा सुंदर शाळा असे मला अभिमानाने सांगावे वाटते, कारण माझ्या शाळेचे अध्यक्ष उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत. ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. चार भिंतीच्या आत शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. राष्ट्रप्रेम, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, एकसंघ भावना निर्माण करणे, थोरामोठ्यांचा आदर करणे, गुरुजनांचा मान सन्मान करणे, आपल्या देशाची परंपरा जोपासणे, देशाची संस्कृती जपणे, आपापसात प्रेम व स्नेहाची भावना तयार करणे, भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी राष्ट्र प्रेमाची भावना या सैनिकी शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली जाते. म्हणून मला माझी शाळा खूप खूप सुंदर शाळा वाटते.

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

पर्व मकर संक्रांती: तिळगुळ --------------------------------------- घ्या, गोड गोड बोला !! प्रेमाचा, एकतेचा संदेश देणारा सण. -------------

पर्व मकर संक्रांती: तिळगुळ
—————————————
घ्या, गोड गोड बोला !! प्रेमाचा, एकतेचा संदेश देणारा सण.
—————————————

मित्रांनो, भारत हा सणांचा देश मानला जातो. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, संप्रदायाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाची परंपरा ही वेगळे, प्रत्येकाची संस्कृती वेगळी, प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे आहे. विविध प्रकारचे सण, उत्सव साजरे केले जातात. हे सण उत्सव निसर्गाच्या चक्राला धरून असतात. निसर्ग नियमानुसार साजरे केले जातात. निसर्गातील ऋतुचक्राप्रमाणे उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा या ऋतुचक्राप्रमाणे त्या त्या ऋतूमध्ये तेथे सण साजरे केले जातात. हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. आपण भूगोल मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. सूर्य हा सर्व राशींमधून भ्रमण करत असतो. मकर संक्रांतीच्या या दिवसापासून सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. 14 ते 15 जानेवारी पासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आपल्या भारतीय परंपरेनुसार या दिवसापासून दिवस तिळा, तिळाने मोठा होत जातो. म्हणून या दिवसाला मकर संक्रांति असे म्हणतात. आज मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! मकर संक्रांति हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे महाराष्ट्रात मकर संक्रांति, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाम मध्ये भोगली बिहू, पंजाब मध्ये लोहिरी, आणि राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो. काही सण पुरुषप्रधान असतात तर काही सण महिलांचे सण म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत विशेषतः मकर संक्रांति हा सण महिलांचा सण म्हणून मानला जातो. हा सण साधारणपणे तीन दिवसांचा मानला जातो. पहिला दिवस भोगी, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनलेला आढळतो. याचा अर्थ खाणे किंवा उपभोग घेणे होय. भोगी हा सण हेमंत ऋतू मध्ये येतो. या दिवसात शेतामध्ये अन्नधान्य बहरलेले असते. या दिवशीचे भोजन आरोग्यास खूप हितकारक असते. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आनंदाने खाल्ली जाते. त्याचा उपभोग घेतला जातो त्याचेच नाव भोगी. म्हणूनच म्हटले जाते, “न खाई भोगी तो सदा बनेगा रोगी” दुसरा दिवस संक्रांति आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. या तीन दिवशी मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी महिला एक एकमेकांना वांन लुटतात. वांन लुटण्याचा कार्यक्रम करतात. सुगडयांची पूजा केली जाते. व विविध प्रकारचे वाण लुटले जाते. या निमित्ताने सर्व महिला एकमेकांच्या घरी जातात. एकमेकांना तिळगुळ देतात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो, एकमेकांना मान सन्मान देतात, एकमेकांच्या पाया पडतात. तिळगुळ घ्या गोडगोड बोला. असा संदेश सर्वांना देतात. साधारणपणे हा महिलांचा उपक्रम पंधरा दिवस चालतो. या संक्रांतीच्या सणाला काही भागात पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. लहान मुले, मोठी माणसे, पतंग उडवतात, पतंगबाजी करतात व आनंद लुटतात. या ऋतूत नुकतेच शेतातील सर्व रान भाज्या मेथी, पालक, चुका, तांदूळसा, पात्राची, गाजर, कोथिंबीर, कढीपत्ता, काकडी, मटकी, करडई, इत्यादी भाजीपाला आलेला असतो. विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी केली जाते. त्यानिमित्ताने आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या वनस्पती मिळतात. त्यामधून आपल्या शरीराला विविध जीवनसत्व मिळतात व आपले आरोग्य निरोगी राहते. हे त्या पाठीमागचे कारण आहे. हे एकमेव वैशिष्ट्य होय. तसेच तीळ व गूळ खाल्ल्याने आपल्या शरीरात गर्मी उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून बचाव होतो हे तीळ व गूळ खाण्याचे फायदे आहेत. संक्रांतीच्या या सणाला बाजारात फेरफटका मारल्यानंतर आपल्याला सर्व दुकाने आशा या विविध वस्तूंनी भरलेली दिसून येतात वान खरेदीसाठी महिलांची गृहिणीचि लगबग व प्रचंड गर्दी झालेली दिसून येते. या सणामुळे एकमेकांच्या घरी जाणे संवाद साधने, चर्चा करणे गाठीभेटी घेणे अशा प्रकारे संपूर्ण भारतभर मकर संक्रांति चा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. प्रेमाचा व एकतेचा संदेश या सणांमधून मिळतो. आपापसातील पूर्वीचे वाद मतभेद मिटवून प्रेमाचा संदेश दिला जातो व मैत्रीचे नाते घट्ट केले जाते.

श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर. जिल्हाउस्मानाबाद.

स्वागत नवीन वर्षाचे :2023

स्वागत नवीन वर्षाचे :
—————————————
नवीन वर्ष सुखाचे जावो
—————————————
नवीन वर्षात पाऊल ठेवताना————-

मित्रांनो,जुने वर्ष बघता बघता संपत आले आणि संपले ही! आता नवीन वर्ष सुरुवात होत आहे. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखी, समाधानी, आनंददायी जावो व सर्व वाचकांचे आरोग्य सुदृढ राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नवीन वर्ष म्हटलं की आपला उत्साह वाढतो. नवीन वर्षात काही तरी नवीन संकल्पना कराव्यात. नवीन वर्षाचा नवीन सूर्योदय, नवीन प्रकाश किरणे, आपल्याला प्रेरणा देतात. आपला उत्साह वाढवतात. नवीन निसर्ग व निसर्गातील सर्व घटक नव्या रूपाने आपल्यासमोर येतात. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन घटनांच्या मधला काळ होय. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण जो काळ अनुभवतो, उपभोगत, त्यालाच जीवन असे म्हणतात. मग जीवन जगत असताना ज्या मूलभूत बाबी घटक आपल्याला आवश्यक असतात ती सगळी आपल्याला निसर्ग मधून मिळतात. म्हणून निसर्गाप्रती आपल्याला कृतज्ञ राहिले पाहिजे. दिवसा मागून दिवस जातात, महिने निघून जातात, वर्ष निघून जातात, आपण मात्र आपल्या कार्यामध्ये रमून जात असतो. आपल्या आयुष्याची वजाबाकी होत असते! जुन्या वर्षांनी आपल्याला काय दिले? आणि नवीन वर्ष आपल्याला काय देईल? याची उत्सुकता लागून राहिलेली असते! जुन्या वर्षांनी आपल्याला खूप अनुभव दिले. वेगवेगळे मार्ग दाखवले. वाट दाखवले आणि आपण त्या वाटेने चालू लागलो. भयंकर अशा राक्षसी कोरोनाचा मुकाबला केला. जीवन जगण्याची धडपड पाहिले, मला जगले पाहिजे, अशी जिद्द ठेवले व त्याप्रमाणे त्याच्या सर्व नियमांचे पालनही केले. परंतु ज्यांनी नियमांचे पालन केले नाही ते अशा रोगाला बळी पडले! व त्यांचे जीवन संपून गेले! आपण सर्वजण कितीतरी नशीबवान आहोत आज नवीन वर्षाचे स्वागत करीत आहोत!! याप्रसंगी देवा, सर्वांना सुखी ठेव व सर्वांच भलकर हीच एकमेव अपेक्षा आपण करूया. कुणीतरी म्हटलेलं आहे, “कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल” बऱ्याच लोकांना वाईट व्यसन करण्याची वाईट सवय लागलेली आहे! वाईट व्यसन सोडा, मद्यपान करून गाडी चालवू नका, दारूच्या व्यसनाने दरवर्षी दीड लाख लोक आपला जीव गमावतात अशी माहिती समोर येते!! आपण विचार केला तर एखाद्या आजाराप्रमाणे मृत्यूची संख्या आहे ही. येणाऱ्या नवीन वर्षात कुठलीही वाईट व्यसन करणार नाही असा संकल्प करा. आपण आणि आपले आरोग्य सांभाळा. आरोग्य ” आरोग्य ही संपत्ती आहे,” आरोग्य सांभाळण्यासाठी चांगला आहार, विहार, व्यायाम, खेळ, योगा, चांगले विचार, चांगले कार्य, दुर्गुणापासून सावध राहा!! दुर्गुण हे आपल्याला फसवतात. फसवण्यासाठी असतात. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. आपली भाषा चांगली ठेवा, समोरील व्यक्तीला चांगले बोला, स्वाभिमान बाळगून अभिमान दूर करा. मनमिळाऊ व विनम्र स्वभाव ठेवाल तर आपले सर्वजण मित्र बनतील! सर्वांच्या मदतीला धावा, सर्वजण तुमच्या मदतीला धावतील! निसर्गाचा एक सरळ नियम आहे, “क्रिया तशी प्रतिक्रिया” तंबाखू, दारू, गांजा, आफु या सोबतच. तरुण व नवयुवकांसाठी सतत चोविस तास मोबाईल बघणे व त्यातील गेम खेळत राहणे म्हणजे युवाशक्तीची प्रगती नव्हे!! मोबाईल हा आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठीच आहे. आपला मित्र आहे. पण त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठीच केला पाहिजे. मोबाईल वरून इंटरनेट वरून आपल्याला संपूर्ण जगाचे ज्ञान, माहिती एका क्लिकवरून कळते आहे ही आपली फार मोठी प्रगती आहे. नवीन वर्षात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा चांगला प्रयोग केला पाहिजे. जीवन जगण्यासाठी समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे. आपल्याला समाधानी राहता आले पाहिजे. जेवढे काही मिळाले आहे त्यात समाधानी राहणे ही एक कला आहे. काटकसर करणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. खरं तर जीवन जगणे ही एक कलाच आहे. प्रत्येकाचे जीवन वेगवेगळे असते. जीवनातील सत्य जाणून सत्य मार्गावर सतत चालत राहणे हे प्रगतीसाठी खूप चांगले आहे. नवीन वर्षात पाऊल ठेवताना विचार करा की, मागील वर्षभरात आपण काय काय केलंय, त्याचा लेखाजोखा करा त्यातून काय अनुभव आला त्या अनुभवातून आपण काय शिकलो? आपल्याला काय संकल्प करता येईल आपल्याला काय दूर करता येईल, काय जवळ करता येईल. घेतलेल्या अनुभवाची शिदोरी आपल्या पुढील पिढीला वाटप करावयाची आहे. व नवीन वर्षाचे स्वागत करावयाचे आहे. खरं तर हा इंग्रजी महिन्याबरोबरच नवीन वर्ष आहे. आता आपणा सर्वांना जगाप्रमाणे पाऊल टाकावे लागते. मग ते शिक्षण असो, व्यवसाय असो, नोकरी असो, कुठलेही क्षेत्र असो अपडेट राहणे ही काळाची गरज आहे! काळा सोबत चालावे लागेल. भविष्य काळातील आपले नियोजन आपल्याजवळ तयार असले पाहिजे. मग ते घर परिवाराबद्दलचे असो, शिक्षणाबद्दलचे असो, नोकरी बद्दलचे असो की, आर्थिक नियोजन असो. यशस्वी जीवनासाठी भविष्यकाळातील अभ्यास व नियोजन वर्तमान काळात करणे व आपले जीवन आनंदी करणे हे आपल्याच हाती आहे.

श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

नूतन वर्षाभिनंदन!! 🌹🌹🌹
—————————————
प्रिय मित्रांनो, पूज्य गुरुजन व सर्व आदरणीय वाचक मंडळी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहो हीच श्री तुळजाभवानी चरणी प्रार्थना. आपण वाचनासाठी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ खर्ची घालता! वर्षभरातील माझ्या छोट्या मोठ्या कविता, तसेच विविध विषयावरील लेख आपण अगदी प्रेमाने वाचन करता व आपल्या प्रतिक्रिया पाठवता व मला प्रेरणा देऊन माझा उत्साह वाढवता त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. असेच प्रेम पुढेही मिळो हीच अपेक्षा

आपलाच स्नेही
————————————-
देविदास पांचाळ तुळजापूर.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आधुनिक काळात मानवतेचे दर्शन . . . !

 

लेखक

श्री देविदास पांचाळ (सर)
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर.

आधुनिक काळ हा वेगवेगळ्या भयंकर आपत्तीतून जात आहे कोरोना महामारी पावसाचा कहर वादळ वाऱ्याचा तडाखा महापौर लॉकडाऊन उपासमारी यामुळे प्रत्येकजण आपण आपले कुटुंब नातीगोती याच विचारात गढून गेलेला आहे किंबहुना माणूस माणसापासून दूर होत चालला आहे अशा काळात माणुसकीचे दर्शन घडविणारे बरेच प्रसंग फोटो आपण टीव्हीवर मोबाईलवर सर्वांनीच पाहिले आहेत.

असाच एक उत्कृष्ट अप्रतिम जंगलातील प्राण्यांचा फोटो पाहण्यात आला तो तुम्हीसुद्धा पाहिला असणारच बघून अंगावर शहारे येणारा प्रसंग त्यात ज्वलंत मानवतेचे दर्शन घडून येते हा फोटो कोणी काढला माहित नाही किंवा बनवला असेल तो भाग वेगळा पण जंगलाचा राजा सिंह व त्याचा नुकताच जन्मलेला छाव्याला अत्यंत कडक अशा उन्हात चाललेला पाहून आपले गजराज म्हणजेच हत्ती त्याचवेळेला ऊन लागू नये व उन्हाने तो मरू नये यासाठी पुढे होऊन इवल्याशा छाव्याला आपल्या तोंडी वर बसवून सुरक्षित सावली व पान व त्याच्याकडे नेत आहे विशेष म्हणजे त्याची आई सिन हत्तीच्या सावलीने चालत आहे जंगलातील आपला शत्रू जरी असला तरी वेळप्रसंगी त्याला मदत केली पाहिजे हाच बोध आपल्या सर्वांना या प्रसंगातून पाहायला मिळतो असे बरेच प्रसंग दररोज आपल्या पाहण्यात ऐकण्यात येत असतात जणू ते माणसाला मानवतेचे धडे देण्यासाठी असतात माणसाने सुद्धा एकमेकांना अशीच मदत करून सहायता करून सर्वधर्मसमभाव पाळला पाहिजे यातच माणुसकीचे दर्शन घडते अशा या निसर्ग देवतेला शतशः नमन…!

शिक्षक -दिन विशेष

शिक्षक : समाजाचा एक
—————————————
सामर्थ्यशाली घटक!
—————————————

पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त – 
—————————————

मित्रांनो, आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त या महामानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन! आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आज पाच सप्टेंबर भारताचे महान शिक्षक, थोर तत्त्वज्ञ, विचारक, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस! एक शिक्षक ते भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचण्याचा मान महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मिळवला! त्यांच्या कार्यापासून, त्यांच्या चरित्रामधून सर्वांना प्रेरणा मिळत राहील. आज शिक्षक दिना बद्दल, शिक्षकांबद्दल थोडसं- – – मित्रांनो, शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारे. एखाद्या शिल्पा प्रमाणे आकार देण्याचं काम शिक्षक करतात. पूर्वी शिक्षकांना कुंभाराचे उदाहरण देत असत. ज्याप्रमाणे कुंभार चिखलापासून वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू बनवत असत. मूर्ती बनवत असत. अगदी त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या अनुभवातून, आपल्या ज्ञानातून, आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून, आपल्या कला गुण कौशल्यातून विद्यार्थ्यांना सतत घडवत असतो. सातत्यपूर्ण घडवणे व सातत्यपूर्ण घडणे ही प्रक्रिया निरंतर चालू असते. शिक्षक व विद्यार्थी यामधील नाते अत्यंत पवित्र व कोमल स्वरूपाचे असते. शिक्षकांनी सांगितलेला शब्द ना शब्द विद्यार्थ्यांच्या मनपटलावर कोरला जातो! विद्यार्थ्यांच्या बालपणीच शिक्षकाकडून चांगले संस्कार घडवले जातात. लहान मुलांच्या कोऱ्या पाटीवर अ आ पासून ते पूर्ण भाषण संभाषण वक्तृत्व कला संपादन करण्यापर्यंत शिक्षक त्यांना पोहोचवतात. भाषेमधील उच्चार, असेल, भाषेमधील शब्दांचा चढ उतार असेल, वेगवेगळ्या शब्दावरील प्रभुत्व असेल, एखादी कविता असेल, कवितेची चाल असेल, कवितेचा अर्थ बोध असेल, कवितेतील व्याकरण असेल, कवितेतील अलंकार असेल, कवितेतील भाव असेल, तो मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य शिक्षक करतात. साधारणपणे विचार केला तर शिक्षक आपल्या अंतकरणातून समोर बसलेल्या छोट्या छोट्या बालकांना ज्ञानदान करण्याचे कार्य करतात. ज्ञानदान करण्यासाठी दोन घटक महत्त्वपूर्ण असतात. एक शिकवणारा आणि दुसरा शिकणारा. शिकणाऱ्याची जर मनातून तीव्र इच्छा असेल, तळमळ असेल, तयारी असेल, मानसिकता असेल तर तो कुठलाही विषय अगदी सहजतेने आत्मसात करू शकतो. शिक्षकांनी शिकवलेले सर्व ज्ञान तो आत्मसात करू शकतो. यात कुठलीही शंका नाही ज्या मुलांना अभ्यासात गोडी वाटत नाही, वाचनात रस वाटत, नाही लेखनात आवड नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी थोडा विलंब लागतो. कालावधी लागतो. शाळा म्हणजे सरस्वतीचे पवित्र मंदिर असते. या सरस्वतीच्या मंदिरचा पुजारी म्हणून शिक्षक कार्य करतात. आपले कर्तव्य बजावत असतात. शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, शिक्षक म्हणजे मित्र, सखा विद्यार्थ्याला प्रेमाने अवघड गोष्ट सोपी करून त्याच्या मनात उतरवणारा तो शिक्षक! ज्याच्याकडे शिस्त, क्षमता व कर्तव्याची जबाबदारी असते तो खरा शिक्षक. आपण थोडासा विचार केला तर लहान वयातच मुलांना शाळेत पाठवले जाते. अगदी लहानपणापासून त्या मुलाच्या मनपटलावर शिक्षकांची छाप पडते. शिक्षकांची भाषा असेल, शिक्षकांचे राहणीमान असेल, शिक्षकांची केशभूषा वेशभूषा असेल, शिक्षकांची वाणी असेल, शिक्षकांचे कला कौशल्य असेल, शिक्षकांचे शिकवण्याचे कौशल्य असेल, या सर्वांचा खोलवर परिणाम विद्यार्थ्यांच्या मनपटलावर होतो. व दिवसेंदिवस त्यात वाढ होत जाते व तो हळूहळू घडत जातो. त्याची जडणघडण होते. मात्र हृदयी साने गुरुजी आपल्या प्रेमळ स्वभावामुळे घराघरात पोहोचले. त्यांच्या श्यामची आई संस्काराच्या रूपाने भारतीयांच्या मनामनात पोहोचलि आणि साने गुरुजी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांच्या संस्काराचा अमूल्य ठेवा पोहोचला. आजही तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना श्यामची आई संस्कार रूपाने प्राप्त होत आहे! त्याचबरोबर विद्यार्थी हा वर्गात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोबत मिळून मिसळून तो एकमेकांकडून शिकत असतो. शिक्षक हा समाज घडवणारा कलावंत असतो. शिक्षक हा समाजाचा मूळ घटक आहे. गाभा घटक आहे. शिक्षक हा समाजाचा सामर्थ्यशाली घटक आहे! कारण वर्गाच्या चार भिंतीच्या आत तो राष्ट्राची उभारणी करतो. राष्ट्र घडवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करत असतो. देशाचा इतिहास असेल, देशाचा भूगोल असेल, देशाची संस्कृती असेल, देशाची परंपरा असेल, देशातील सण, उत्सव असतील, या सर्वांची मूलभूत माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात, सन का साजरे केले जातात? त्या पाठी मागील उद्देश काय आहे? देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असेल, जगातील विविध ऐतिहासिक घटना असतील, देशातील महापुरुष त्यांचे चरित्र, जगातील महापुरुष त्यांचे चरित्र, त्यांचे कार्य त्यांनी पार पाडलेली कर्तव्य जबाबदारी या सगळ्या गोष्टीचे ज्ञान शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. आपण कोण आहोत? आपल्याला काय करायचे आहे? आपले कर्तव्य काय आहे? भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे? याची दिशा देणारे योग्य मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे शिक्षक होय. वर्गामध्ये प्रत्येक स्तरातून आलेला विद्यार्थी असतात. समाजाच्या प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या भाषा बोलणारा, वेगवेगळ्या पर्यावरणातून वातावरणातून विद्यार्थी आलेले असतात. त्यांची भाषा, त्यांची बोली, त्यांची वेशभूषा ही वेगवेगळी असते. त्याचबरोबर प्रत्येकाची मानसिकता, प्रत्येकाची बुद्धिमत्ता, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, प्रत्येकाची विचाराची उंची ही वेगवेगळी असते. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहण क्षमता ही सुद्धा वेगवेगळी असते. विद्यार्थ्यांच्या ग्रहण क्षमतेवर आकलन क्षमतेवर त्याचा अभ्यास, त्याची प्रगती अवलंबून असते., फक्त मार्काची टक्केवारी बघून आपण तो विद्यार्थी हुशार किंवा साधारण असा निष्कर्ष काढतो. परंतु हा निष्कर्ष किती बरोबर आहे. अभ्यास करण्यापलीकडे जाऊन विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण, कला कौशल्य लपलेले असतात. सुप्त अवस्थेत असतात. या कलागुणांना वाव देण्याचे काम या कलागुणांना बाहेर आणण्याचे काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी, कृती करण्यासाठी, उपक्रम करण्यासाठी, चित्रकला, संगीत, गीत गायन करण्यासाठी, एखादी कला सादर करण्यासाठी प्रेरित करतात. उत्साहीत करतात व त्याला सहभागी करून घेतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी शिक्षक हे आपापली जबाबदारी पार पाडण्याचे कार्य करतात. आपले कर्तव्य जबाबदारीने पूर्ण करण्याचे कार्य करतात मग ते समाजातील कुठलेही कार्य असो. आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले, तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली व सर्व अध्ययन अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले परंतु अशा या धावपळीत खरा शिक्षक हा बाजूलाच राहिला. मनमिळाऊ, प्रेमळ, विद्यार्थ्यांना समजून घेणारा, विद्यार्थ्यांना समजून सांगणारा त्याला काय पाहिजे आहे हे ओळखणारा व त्याला योग्य उपचार करणारा हा शिक्षक. आधुनिक काळात तंत्रज्ञानाने बाजूला सरला असेच आपल्याला म्हणावे लागेल. विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शिक्षक हे शिक्षकच असतात. त्यांचे स्थान अढळ आहे. पुनश्च एकदा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन व सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद

लेखक
—————————————
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबा

X