श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात विद्धेची देवता श्री गणेश यांची अतिशय जल्लोष्यात स्थापना करण्यात आली, सर्व मुलांनी नाच -गाणे करत वाजता गाजत बाप्पाचे स्वागत केले

आला आला आला माझा
—————————————
गणराय आला – – – – – –
—————————————

राष्ट्रीय एकता व अखंडतेचे दर्शन
—————————————
घडवणारा गणेशोत्सव!

मित्रांनो, भारत हा सणांचा देश, उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. भारत देशात विविध जाती, धर्माचे पंथाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात व प्रत्येक सण, उत्सव, महोत्सव हा आनंदाने साजरा करतात. आज आपण गणेशोत्सवाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया संस्कृती ही आपल्या देशाचा प्राण आहे असे म्हणतात. ही आपली परंपरा आहे व ती आजतागायत जशीच्या तशी सुरू आहे. श्रावण महिना व श्रावण महिन्यातील सणांची सांगता झालेली आहे. नुकताच श्रावण महिना संपला व भाद्रपद सुरुवात झाला. या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वांचा लाडका, सर्वांचा प्रिय, सर्वांना पूजनीय, वंदनीय, घराघरातून आनंद, उत्साह, वाढवणारा, आपल्या सर्वांना बुद्धी, सद्बुद्धी, सदविचार देणारा 64 कलेचा अधिपती श्री गणेशाचे लवकरच आगमन होत आहे. श्री गणेशोत्सव सुरुवात होत आहे. पवित्र श्रावण महिना संपताच शेतकरी राजा यांचा आनंदाचा सण बैलपोळा ही संपला की लगेच वेध लागतात ते श्री गणेशोत्सवाचे! श्री गणेशोत्सवाला सुरुवात होते. आणि सगळीकडे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे सुरुवात होते. सर्वजण श्री गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. कोरोनाच्या महामारीच्या गेल्या दोन वर्षात आपली आणि श्री गणरायाची भेट ही झाली नाही पण यावर्षी मात्र मुक्तपणे आनंदाने श्री गणेशोत्सव आपण साजरा करू शकतो. श्री गणेश ही बुद्धीची देवता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो सहसा विद्यार्थ्यांचे खास दैवत, प्रिय, संकट दूर करणारा, संकट मोचन हारी, म्हणून श्री गणेशाला प्रार्थना केली जाते. भक्ती केली जाते. सुखकर्ता आणि दुःखहर्ता असणारा श्री गणेश सुख देणारा व आपले दुःख दूर करणारा गणपती बाप्पा मोरया! अशा गणपती बाप्पाचा गणेशोत्सव हा जवळजवळ दहा दिवसाचा असतो. सलग दहा दिवस सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा आरती व महाप्रसाद केला जातो. पूर्वी हा गणेशोत्सव दहा दिवस लेझीम, टिपऱ्या, नाटके, मेळे, इत्यादी समाज जागृतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम केले जात असत. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्या देशाचे वैभव आहे. विविध सामाजिक विषयावर, समस्येवर लक्ष केंद्रित करून जागृती केली जात असे. हा गणेशोत्सव लहान थोर सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय एकत्र येऊन अत्यंत आनंदाने एकतेने साजरा केला जात असे. त्या निमित्ताने गावातील, शहरातील, गल्लीतील, कॉलनीतील सर्वजण एकत्र येतात. लहान मोठा गरीब श्रीमंत पुरुष स्त्री असा कोणताही भेदाभेद केला जात नाही! एकता व एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीमध्ये सनई, चौघडा विविध वाद्यांच्या मधुर आवाजात साजरा केला जात असे. चिखलापासून किंवा शाडूपासून गणपती बनवले जात असत
जेणेकरून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जायची. पूर्वी आणि आजही काही कलाकार चित्रकलेच्या माध्यमातून, शिल्पकलेच्या माध्यमातून, मूर्तिकलेच्या माध्यमातून श्री गणेशाची मूर्ती तयार करतात. कोणी खडू, कोणी शाडू, कोणी चिखल तर कोणी वाळू मधील श्री गणेश मूर्तीची शिल्प साकारता! तर कोणी वृक्ष लागवड करून श्री ची मूर्ती तयार करतात! आपली सेवा भक्ती व्यक्त करतात. अशी “चीक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, त्याने गोड हसून मोठा आशीर्वाद दिला ग चला चला करूया नमन गणरायाला ग! अशा प्रकारे प्रत्येक जण आपापल्या परीने श्री गणेशाची भक्ती सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. आधुनिक काळात जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गणपती गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. ही काळाची खरी गरज आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी, एकतेचे महत्त्व, शक्ति, पटवून देण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. तसेच केसरी या वृत्तपत्रातून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा प्रश्न विचारून इंग्रज सरकारला हादरा दिला व सळोकी पळो करून सोडले! देशप्रेम, त्याग, बलिदान, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी महायज्ञ सुरू केला. त्या महायज्ञात लाखो वीरांनी शु रा नी आपले बलिदान दिले. श्री गणेशाचे वाहन म्हणून उंदीर मामा असतात. प्रत्येक वेळी वेळोवेळी श्रींचे मदत करावयास तयार असतात. तेव्हा गणेशजी सोबत उंदीर मामाची ही पूजा केली जाते. गणपतीचे लाडू हे उंदीर मामा नाही दिले जातात. श्री गणेशाला आवडणाऱ्या दुर्वा म्हणजेच हराळी व आगरडा हा निसर्गातूनच मिळतो. तसेच पाने, फुले, विविध फळे हा निसर्ग आपल्याला देतो. म्हणजेच आपण या निसर्गाचे काही देणे लागतो. कारण निसर्ग आपल्याला सर्व काही मोफत देतो त्याचे फार मोठे रून आपल्यावर असतात. ते कधी ना कधी फेडावे लागतात. श्री गणेशाला मोदक खूप आवडतात. मोदक आणि लाडू हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत. म्हणून श्री गणेशाला लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवतात. येणारा भविष्यकाळ सर्वांना सुखी आनंदी समृद्धीचा येवो ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना व सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🏻🙏🏻

लेखक
————————————–
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

X