श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय यास "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2024"
गौरव पुरस्कार प्राप्त.

श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी विद्यालयास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार बक्षीस वितरण सोहळा मुंबई येथील टाटा थिएटर इथे दिनांक 6 मार्च 2024 रोजी पार पडला.

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करिता”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हे अभियान दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले.

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि माननीय डॉ. सचिन ओम्बासे,  धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, उपविभागीय अधिकारी संजय कुमार डवहळे, तसेच श्री. सोमनाथ वाडकर( तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान), श्री.अरविंद बोळंगे( तहसीलदार तुळजापूर) यांची प्रेरणा व सतत मिळालेले मार्गदर्शन व सहकार्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. घोडके वैजनाथ यांच्या पुढाकाराने विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक माजी विद्यार्थी सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती विद्यार्थी यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला . यामध्ये सैनिकी विद्यालय तुळजापूर तालुक्यातून प्रथम धाराशिव जिल्ह्यातून प्रथम तसेच लातूर विभागात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे पुरस्कारात 11 लक्ष रुपयाच्या धनादेश सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

ना.  एकनाथ शिंदे( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या शुभहस्ते व ना. दीपक केसरकर ( मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा ),श्री. कपिल पाटील (विधान परिषद सदस्य ) श्री. रणजीत सिंग देऊळ (भारतीय प्रशासन सेवा प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य ) श्री. सुरज मांढरे (भारतीय प्रशासन सेवा आयुक्त शिक्षण )व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते लातूर विभागात तिसऱ्या  क्रमांकाचा पुरस्कार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे संस्थानाचे व्यवस्थापक व तहसीलदार सोमनाथ जी वाडकर, विद्यालयाचे प्राचार्य घोडके व्ही. बी, गटशिक्षणाधिकारी श्रीमती मेहरूनि सा ईनामदार,विस्ताराधिकारी दत्तप्रसाद जंगम ,केंद्रप्रमुख सतीश हुंडेकरी ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय हुंडेकरी तसेच विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वीकारला .

विद्यालयाच्या यशाचे कौतुक अभिनंदन 

मा.  डॉ. सचिन ओम्बासे  धाराशिव जिल्हाचे जिल्हाधिकारी व अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंग पाटील, उपविभागीय अधिकारी संजय कुमार डवहळे तसेच सोमनाथ वाडकर (तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन तुळजाभवानी मंदिर संस्थान ) श्री.अरविंद बोळंगे (तहसीलदार तुळजापूर )यांनी केले

या उत्तंग यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

X