वैजनाथ घोडके यांना” मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त !


तुळजापूर. – येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित, श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ बिराप्पा घोडके यांना त्यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे स्वातंत्र्य संग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या जयंतीनिमित्त “मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने तुळजापूर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्यावतीने दिला जाणारा मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाद सबनीस, श्रीमान ताकभाते गटविकास अधिकारी तुळजापूर. माननीय महेंद्र काका धुरगुडे, श्री राजकुमार धुरगुडे, श्रीमती विमलताई धुरगुडे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती, शाळेची प्रगती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व विकास तसेच शाळेत वेळोवेळी घेण्यात आलेले विविध शालेय व सहशालेय उपक्रम रक्तदान शिबिर,( यावर्षी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक असे एकूण 55 लोकांनी रक्तदान केले) .

वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता अभियान, शाळेतील ई लर्निंग सुविधा, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण राबवणे, योगा प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची स्वच्छता व आरोग्य यासाठी वेळोवेळी केलेले उपक्रम, सामाजिक जनजागृती, उपक्रम गेल्या 20 ते 22 वर्षात शाळेने केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती, माझी शाळा सुंदर शाळा, आदर्श शाळा पुरस्कार, विविध सामाजिक उपक्रमातील सहभाग, पालकांची शैक्षणिक जागृती तसेच उत्कृष्ट व्यवस्थापन व आदर्श व्यक्तिमत्व या विविध गुणांमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या यशाबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव व माननीय तहसीलदार यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे कमांडंट श्री प्रणव पांडा व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्वत्र कौतुक होत आहे.

X