सैनिकी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर, पर्यवेक्षक डॉक्टर पेटकर सर तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री पडनूर सर, बाल अध्यक्ष, बाल प्रमुख पाहुणे, यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झाली श्री सुरवसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य श्रीमान घोडके सर यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुस्तकांचे वाचन केले. गांधी जयंती निमित्त वाचन उपक्रम राबवण्यात आला गांधीजींच्या जीवनावरील स्पर्धा परीक्षा प्रमुख श्रीमान वाडिकर सर यांच्या समवेत याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील श्रीमान देविदास पांचाळ सर यांचा” राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला शिल्ल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रगट करण्याचे कार्य सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमान स्वामी सर यांनी केले.

Shri Panchal R.S
शिक्षक रत्न पारितोषिक
Shri Panchal R.S
Previous
Next

राष्ट्रपिता महात्मा गांधी चे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे करीता आणि  त्या सोबतच विद्यार्थ्यां  मध्ये वाचन संस्कृति वाढीस लावण्याकरिता विद्यालयात राबविलेले स्तुत्य उपक्रम .

X