सैनिकी विद्यालयात स्वच्छता कार्यक्रम

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त” एक दिवस – एक तास स्वच्छतेसाठी” या उपक्रमा अंतर्गत शाळेची स्वच्छता, वर्ग खोल्यांची स्वच्छता, वसतिगृहांची स्वच्छता, भोजन विभागाची स्वच्छता, क्रीडांगण स्वच्छता, व साफसफाई विद्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली! “स्वच्छता हा जीवनाचा मूलमंत्र आहे “असा संदेश गांधीजींनी जगाला दिला. तोच आज स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके व्हीबी, संस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी आर एस. वस्तीगृह विभाग प्रमुख, भोजन विभाग प्रमुख, संगणक विभाग प्रमुख, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छतेचे काम आनंदाने व उत्साहाने केले तो क्षण.

 
X