प्रस्तावना -ः

श्री तुळजाभवानी सैनिकी मा. व उ.मा. विद्यालय, तुळजापूर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन नगरीत तिच्याच नावाने सुरू असलेल्या, तुळजापूर शहराच्या उत्तरेला, बालाघाटाच्या पर्वत रांगावर भव्य व टुमदार, नयनरम्य अशी शाळेची भव्य व सुंदर इमारत आपणा सर्वांचे लक्ष वेधून घेते! हेच ते श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर. महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा या धोरणानुसार 15 ऑगस्ट 1996 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूरची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर सन 2008-09 मध्ये विद्यालयाला विशेष आदिवासी तुकडी सुरू करण्याची मान्यता प्राप्त झाली. आज रोजी विद्यालयात इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या बारा तुकड्या असून त्यामध्ये 530 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत,व 18 शिक्षक हे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. हे विद्यालय निवासी असून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी भव्य व सुसज्ज असे वस्तीगृह व भोजन कक्ष बांधण्यात आले आहे. 

या विद्यालयाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर माननीय श्री कौस्तुभ दिवेगावकर साहेब, तसेच विश्वस्त माननीय नामदार श्री राणा जगजीत सिंह पाटील आमदार तुळजापूर, श्रीमान योगेश खरमाटे विश्वस्त, माननीय नगराध्यक्ष तसेच श्रीमान सौदागर तांदळे तहसीलदार तुळजापूर तसेच श्रीमती योगिता कोल्हे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर. या सर्व सन्माननीय विश्वस्तांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयाचा दीपस्तंभ आज संपूर्ण महाराष्ट्रात तेजोमय झालेला आहे. गेल्या 22 23 वर्षापासून विद्यालयाचे आदर्श व उत्कृष्ट प्राचार्य म्हणून श्री घोडके वैजनाथ बिराप्पा यांचा नावलौकिक आहे. सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अपार परिश्रमातून विद्यालयाने कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विजयाच्या दिशेने उत्तुंग भरारी घेतलेली आहे!

सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🌹🌹

Tender No.

Header

Description

From Date

To Date

From Time

To Time

Action

235

CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGG FOR STBSVT

CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGG FOR STBSVT

15/11/2022

21/11/2022

10:00

17:00

Download CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGGS FOR STBSVT 14112022

236

CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT

CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT

15/11/2022

21/11/2022

10:00

17:00

Download CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT 14112022

237

CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING

CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING

15/11/2022

21/11/2022

10:00

17:00

Download    CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING 14112022

241

CIRCULAR FOR QUOTATION FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT

CIRCULAR FOR QUOTATION FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT

15/11/2022

21/11/2022

10:00

17:00

Download CIRCULAR FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT 14112022

X