विद्यालयातील गुणवंत माजी  विद्यार्थ्यांची माहिती

                                                                नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या शाळेच्या संकल्प विषयी आपल्याला यापूर्वीच माहिती दिलेली आहे. माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपवरती गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली होती. हा फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणी अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर त्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी या लिंकद्वारे आपली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे.
त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी अशीही सूचना केली होती, की शाळेची वेबसाईट असावी.
आपल्या अपेक्षेप्रमाणे यापूर्वीच शाळेची वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. याविषयी माहिती सांगताना
आम्हाला आनंद होत आहे. 18 जानेवारी 2023 रोजी मा. डॉ. सचिन ओम्बासे, उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या हस्ते शाळेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या वर्तमान युगाची गरज लक्षात घेऊन शाळेतील विविध उपक्रम, देदीप्यमान यशाच्या दिशेने होणारी शाळेची वाटचाल, शाळेचा बदलता चेहरामोहरा पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास यावा यासाठी या वेबसाईटची निर्मिती करण्यात आलेली आहे
प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. सरांच्या मार्गदर्शनाखाली उच्च माध्यमिक विभागात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापन करणारे तंत्रस्नेही प्राध्यापक श्रीनिवास कदम सर यांनी परिश्रमाने शाळेची वेबसाईट तयार केली आहे.या Website च्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांची ओळख करून देताना ,विविध क्षेत्रात उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य करीत असलेल्या माजी विद्यार्थ्यां विषयी प्राचार्यांनी माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे मा. जिल्हाधिकारी प्रभावित झाले. या वेळी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सव साजरा करावा असे सांगितले.
माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रौप्या महोत्सव साजरा केल्यास शाळेतील आजी विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी भावना माननीय जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली, मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पानेनुसार रौप्याम्होत्सव साजरा करणयासाठी शाळेचा वेबसाईट वर खलील फॉर्म देण्यात आला आहे. या फॉर्म मध्ये आपण आपली सर्व माहिती फोटो सह अपलोड करू शकता.

याचा सर्व माजी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपली यशस्वी वाटचाल आमच्या पर्यंत पोहचवावी.

Alumini Form 2023

Click or drag a file to this area to upload.
पुढील शिक्षणासाठी / व्यवसायाकरिता / नौकरी तुम्ही कोणत्या शाखेची निवड केली आहे.
पुढील शिक्षण घेत असल्यास तसा उल्लेख करावा.
सैनिकी विद्यालय तुळजापूर साठी तुम्हाला काही करायचे आहे किंवा सुचवायचे आहे.
स्वतःबद्दल वैशिष्ट्यपूर्ण माहिती नोंदवा (ऐच्छिक)

1) डॉ.बदोले गिरीष – जिल्हाधिकारी कर्नाटक राज्यात कार्यरत

2) डॉ.बनसोडे विकास – आयपीएस अधिकारी कोलकता

3) उंडे अरूण – उपायुक्त म..रा. उत्पादन शुल्क विभाग, मुंबई.उपजिल्हाधिकारी पदी निवड

4) भुजबळ सुर्यकांत – गटविकास अधिकारी औसा,येथे कार्यरत
5) अनुप गिरी – सहायक पोलिस निरीक्षक पदी मुंबई येथे कार्यरत
6) विलास नवले – पोलिस उपनिरीक्षक पदी लातुर येथे कार्यरत
7) गोरे श्रीकृष्ण – पोलिस उपनिरीक्षक पदी पनवेल येथे कार्यरत
8) घुले सत्यजित – पोलिस उपनिरीक्षक पदी येथे कार्यरत

10) डॉ. श्रीकांत लोंढे – एमबीबीएस.,

11) डॉ. अक्षय चौधरी – एमबीबीएस.,
12) डॉ. बाबासाहेब देषमुख – एमबीबीएस.,
13) डॉ. रणजित कदम – एमबीबीएस.
14) डॉ. नरेष सोनकवडे – एमबीबीएस.,
15) डॉ. व्यंकटेष सोनकवडे – एमबीबीएस.,
16) डॉ. ऋषिकेष सावंत – एमबीबीएस.,
17) डॉ.स्वप्नील तट – बीडीएस. 

X