H.S.C Result 2022 श्री.तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा 12 वी चा निकाल 100 %

तुळजापूर, दि. 8 (प्रतिनिधी) :

श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर संचलीत श्री.तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वीचा विज्ञान शाखेचा निकाल 100 % लागलेला आहे. यामध्ये एकूण 59 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 14 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर 45 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेत गुणानुक्रमे-कु.राठोड सुशांत शिवाजी 82.83 %, कु.पाटील श्रीनिवास प्रविण 81.33 % व कु.यादव विशाल जीवन 80.00 % गुण घेवून विद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X